5G तंत्रज्ञान म्हणजे काय ?
मोबाईल नेटवर्कची पाचवी पिढी म्हणजेच 5G-Fifth Generation of Mobile Internet Technology. जसे 1G, 2G, 3G आणि 4G आहे त्याचप्रमाणे 5G Network Technology आहे. 5G चा निर्माण या जगातल्या प्रत्येकाला जोडण्याच्या Virtually Connect उद्देशाने करण्यात आलेला आहे. सर्व इलेक्ट्रॉनिक मशीन, वस्तू यांना एकमेकांशी इंटरनेट च्या सहाय्याने जोडण्यास 5G उपयोगाचे ठरणार आहे. Internet Of Things च्या क्षेत्रात 5G चे विशेष महत्त्व आहे असे मानण्यात येत आहे. 5G Mobile Network वापरकर्त्यांना अनेक Gbps (Gigabyte Per Second) इंटरनेट स्पीड प्रदान करण्याची क्षमता ठेवत आहे. Gb Per second म्हणजे एक सेकंदात 1Gb पेक्षा जास्त आकाराचा डेटा Transfer करण्याची क्षमता. ही Technology विशेषतः High Internet Speed साठी Design करण्यात आलेली आहे. 4G शी तुलना केली तर 5G ची स्पीड 100 पटीने जास्त आहे. 5G ची विश्वसनीयता (Reliability) सुद्धा अधिक आहे. 5G चा विलंब वेळ (Latency) मिली सेकंद इतका आहे.
5G Mobile Network हे मध्ये कमी जागेत जास्त मोबाईल ला कनेक्ट करू शकते. एका चौरस किलोमीटर मध्ये 1000 मोबाईल ला इंटरनेट सेवा पुरवण्याची टाकत 5G मध्ये आहे. हे तंत्रज्ञान आल्याने इंटरनेट च्या साहाय्याने करायची कामे वेगाने पूर्ण होण्यास मदत होईल. नेटवर्क च्या अनुपलब्धतेमुळे अधुरे असलेले आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्ग खुले झालेले आहेत. 5G आल्यामुळे नवीन- नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू, मशीन चा शोध लागेल. मोबाईल नेटवर्क ची एक नवीन आधुनिक पिढी सुरू झाली आहे.
5G तंत्रज्ञानाचे फायदे :
1) 5G वेगवान इंटरनेट स्पीड मिळणार आहे.
2) स्मार्टफोन मध्ये कमी बॅटरी खर्च होणार.
3) Internet of Things च्या क्षेत्रात खूप प्रगती होणार.
4) स्वयंचलित वाहने, स्मार्ट होम्स, स्मार्ट सिटी, अश्या भविष्यातील कल्पनांना वास्तविक स्वरूप मिळण्यास मदत होणार.
5) शैक्षणिक, औद्योगिक, वैद्यकीय अश्या सर्व क्षेत्रात 5G चा फायदा होईल.