Friday, March 17, 2023

 5G तंत्रज्ञान म्हणजे काय ?

मोबाईल नेटवर्कची पाचवी पिढी म्हणजेच 5G-Fifth Generation of Mobile Internet Technology. जसे 1G, 2G, 3G आणि 4G आहे त्याचप्रमाणे 5G Network Technology आहे. 5G चा निर्माण या जगातल्या प्रत्येकाला जोडण्याच्या Virtually Connect उद्देशाने करण्यात आलेला आहे. सर्व इलेक्ट्रॉनिक मशीन, वस्तू यांना एकमेकांशी इंटरनेट च्या सहाय्याने जोडण्यास 5G उपयोगाचे ठरणार आहे. Internet Of Things च्या क्षेत्रात 5G चे विशेष महत्त्व आहे असे मानण्यात येत आहे. 5G Mobile Network वापरकर्त्यांना अनेक Gbps (Gigabyte Per Second) इंटरनेट स्पीड प्रदान करण्याची क्षमता ठेवत आहे. Gb Per second म्हणजे एक सेकंदात 1Gb पेक्षा जास्त आकाराचा डेटा Transfer करण्याची क्षमता. ही Technology विशेषतः High Internet Speed साठी Design करण्यात आलेली आहे. 4G शी तुलना केली तर 5G ची स्पीड 100 पटीने जास्त आहे. 5G ची विश्वसनीयता (Reliability) सुद्धा अधिक आहे. 5G चा विलंब वेळ (Latency) मिली सेकंद इतका आहे.

5G Mobile Network हे मध्ये कमी जागेत जास्त मोबाईल ला कनेक्ट करू शकते. एका चौरस किलोमीटर मध्ये 1000 मोबाईल ला इंटरनेट सेवा पुरवण्याची टाकत 5G मध्ये आहे. हे तंत्रज्ञान आल्याने इंटरनेट च्या साहाय्याने करायची कामे वेगाने पूर्ण होण्यास मदत होईल. नेटवर्क च्या अनुपलब्धतेमुळे अधुरे असलेले आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्ग खुले झालेले आहेत. 5G आल्यामुळे नवीन- नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू, मशीन चा शोध लागेल. मोबाईल नेटवर्क ची एक नवीन आधुनिक पिढी सुरू झाली आहे.


5G तंत्रज्ञानाचे फायदे :

1) 5G वेगवान इंटरनेट स्पीड मिळणार आहे.

2) स्मार्टफोन मध्ये कमी बॅटरी खर्च होणार.

3) Internet of Things च्या क्षेत्रात खूप प्रगती होणार.

4) स्वयंचलित वाहने, स्मार्ट होम्स, स्मार्ट सिटी, अश्या भविष्यातील कल्पनांना वास्तविक स्वरूप मिळण्यास मदत होणार.

5) शैक्षणिक, औद्योगिक, वैद्यकीय अश्या सर्व क्षेत्रात 5G चा फायदा होईल.




 राउटर (Router ) |

राउटर हा इंटरनेट इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस पर्यंत पोहचविण्यासाठी मदत करणार साधन आहे. आपण राउटरला एक लहान इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस म्हणून समजू शकता जे एका वायर्ड (Wired) किंवा वायरलेस कनेक्शनद्वारे (Wireless Connection) अनेक संगणक नेटवर्कला जोडते. म्हणजेच राउटर (Router) कॉम्प्यूटर नेटवर्कला दुसर्‍या कॉम्प्यूटर नेटवर्कशी जोडतो किंवा संगणक नेटवर्कला इंटरनेटशी जोडतो.

आपण राउटरचे नाव ऐकले असेलच कारण ते आजकाल इंटरनेटसाठी वापरले जाते. आपण मोबाईल नेटवर्क वगळता वायरलेस नेटवर्किंग डिव्हाइसवरून इंटरनेटमध्ये प्रवेश करू शकतो.म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास WiFi साठी आपण जे डिव्हाइस वापरतो त्याला राउटर (Router) असे म्हणतात.


राउटर कसे काम करते? 

राउटर या हार्डवेअर नेटवर्किंग डिव्हाइसमध्ये पॅकेटच्या रूपात एका नेटवर्कवरून दुसर्‍या नेटवर्कवर गेलेला कोणत्याही स्वरूपाचा डेटा असतो. त्यानंतर जेव्हा राउटरला पॅकेट डेटा प्राप्त होतो तेव्हा डेटा पॅकेटमध्ये लपलेल्या माहितीचे विश्लेषण केल्यानंतर ती माहिती डेस्टिनेशन डिव्हाइसवर दाखवली जाते.

यासाठी Router कॉम्प्युइंटरनेटवर्क ओएसआय मॉडेलचे (CompuInternetworkOSI Model) अनुसरण करते. ओएसआय मॉडेलच्या सात थरांपैकी नेटवर्क स्तरावर राउटर कार्य करते. हे डिव्हाइस हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचे मिळून बनलेले आहे.

यात एक इंटरनेट वर्क ऑपरेटिंग सिस्टम, सीपीयू, मेमरी स्टोरेज आणि काही आय/ओ पोर्ट्स (I/O Ports) असतात. ही ऑपरेटिंग सिस्टम विंडोज (Windows) किंवा मॅक (MAC) सारखी नाही. स्टोरेज मेमरीमध्ये राउटिंग अल्गोरिदम आणि राउटिंग टेबल संग्रहित असतात.

राउटिंग अल्गोरिदम आणि राउटिंग टेबलद्वारे हे माहीत होते की जे इनपुट पॅकेट प्राप्त झाले आहे ते पॅकेट कोणत्या नेटवर्कला किंवा कोणत्या डिव्हाइसला पाठवायचे आहे. याला विश्लेषण म्हणजेच (Analyze) म्हणतात.

म्हणजेच राउटरचे मुख्य कार्य हे पॅकेट प्राप्त करणे आणि प्राप्तकर्त्याकडे देणे. ज्यामध्ये प्राप्तकर्त्याचा आयपी पत्ता असतो.

------------------

राउटरचे प्रकार – Types of Routers

1 – ब्रॉडबँड राउटर – Broadband Router

ब्रॉडबँड राउटर अनेक प्रकारची कामे करू शकते. ते संगणक कनेक्ट करण्यासाठी आणि त्यांना इंटरनेटशी कनेक्ट करण्यासाठी वापरले जातात. आपण व्हॉईस ओव्हर आयपी तंत्रज्ञानाद्वारे आपला फोन इंटरनेटशी कनेक्ट करू इच्छित असल्यास आपल्याला ब्रॉडबँड राउटर वापरावा लागेल. हा राउटर मोडेमचा एक विशेष प्रकार आहे ज्यामध्ये इथरनेट आणि फोन जॅक देखील आहेत.

2 – वायरलेस राउटर – Wireless Router

वायरलेस राउटर आजकाल प्रत्येकाला माहित आहे. त्याचा वापर घर, ऑफिस, संस्थेमध्ये जास्त केला जातो. सध्या या वायरलेस राउटरवरून इंटरनेट वापरता येते. हे वायरलेस राउटर वायरलेस सिग्नलचे क्षेत्र तयार करते आणि त्या भागातील सर्व संगणक, टॅब्लेट, मोबाइल फोन ते इंटरनेट वापरू शकतात.

सुरक्षेचा विचार करून, त्यांच्यामध्ये एक संकेतशब्द प्रणाली आहे. सुरक्षिततेसाठी संकेतशब्द आणि आयपी पत्ता वापरला जातो. मग Wi Fi शी कनेक्ट करण्यापूर्वी आपल्याला संकेतशब्द (Password) प्रविष्ट करणे आवश्यक आहे.

सध्या मार्केट मध्ये वेगवेगळ्या कंपनीचे राउटर माफक दरात उपलब्ध आहेत. मात्र राउटर विकत घेताना टेक्निकल व्यक्तीसोबत आपल्या गरजा काय आहेत त्यानुसार राउटर कोणता घेतला पाहिजे हे पाहणं गरजेचं आहे  




Friday, October 10, 2008

इ-मेल

इ-मेल किवा इलेक्ट्रानिक्स मेल म्हणजे इलेक्ट्रानिक्स मसेज होय. ग्राफिक्स , फोटो , विडियो किवा फाइल , डाटा या ईमेल मधून सहज जगात कुठे ही एका मिनिटा मध्ये जावू शकतो . आपण ईमेल च्या माध्यमातून आपल्या प्रियजन व्यक्तिना किवा अजुन कुणाला ही मेल पाठवू शकतो . ज्या प्रमाने आपण मोबाइल मध्ये SmS करतो त्याच प्रमाने ईमेल असते .एकच ईमेल बर्याच व्यक्तिना पाठवू शकतो शिवाय बर्याच लोकाना ईमेल करताना त्याना कळाले नाही पाहिजे की आपण कुणा कुणाला ईमेल पाठवले आजे तर ते ही BCC ह्या आप्शन मध्ये सर्व व्यकतिंची नावे म्हणजेच एड्रेस टाइप करावा नॉर्मली आपन ईमेल पाठवण्या साठी To या आप्शन मध्ये सर्वांची नावे टाइप करतो . या साठी आपणास एक ईमेल अकाउंट उघडावे लागेत आणि पीसी इंटरनेटशी जोडलेला असला पाहिजे . सध्या याहू , जीमेल , Aol किवा rediffmail अशी बरीच डोमिन आहेत की जे फ्री अकाउंट उघडण्यासाठी परमिशन देतात .


ईमेल मध्ये ३ बाबी महत्वाच्या असतात .

१) एड्रेस :- यात आपण कोणाला मसेज पठावत आहे त्याचा ईमेल आय .डी. असतो ज़र ईमेल आयडी चुकला तर मसेज जात नाही . थोडक्यात ज्याला आपण मेसेज करणार आहोत त्याचे नाव व्यवस्तित असणे गरजेच असत उदा. prasad_sakat@yahoo.com

२) सब्जेक्ट :- यात आपण जे आपणास समोरील व्यक्तिना संदेश द्यायचा आहे तो लिहावा लागतो .हा संदेश ग्राफिक्स , फोटो , विडियो किवा फाइल , डाटा या सुरुपाचा असतो.

३)अटैचमेंट :- म्हणजे आपण आपल्या ईमेल बरोबर पठावणारी फाइल होय . ती आपणास ईमेल बरोबर जोड़ने आवशक असते . बरच वेळेस फाइल न जोड़ता आपण ईमेल समोरील व्यक्तिना पाठवतो त्या मुळे अटैचमेंट ईमेल ला जोड़ने आवशक असते . जॉब साठी आपला बायो डाटा आपण ईमेल ला अटैचमेंट मध्ये जोडून समोरील व्यकतिला पाठवतो . अटैचमेंट ग्राफिक्स , फोटो , विडियो किवा फाइल , डाटा या स्वरूपात असते .

Wednesday, October 8, 2008

एम.एस.-डॉस

एम.एस.-डॉस म्हणजेच मिक्रो सॉफ्ट डिस्क ऑपरेटिंग सिस्टम DOS ( Disk Operating system ) डॉस ही सिंगल यूज़र ऑपरेटिंग सिस्टम आहे . म्हणजे एका वेळी एकाच व्यक्ति संगनकावर फाइल बनवू शकतो .डॉस मध्ये इंटरनल आणि एक्स्टेर्नल कमांड असतात . एम।एस।-डॉस सुरु करण्या साठी स्टार्ट मेनू वर क्लिक करून प्रोग्राम्स नतर एकसेसोरी मध्ये Command Prompt वर क्लिक करणे. डॉस मध्ये माउस नोर्मल मोड मध्ये चालत नाही म्हणुन आपण कीबोर्ड चा वापर करतो .

इंटरनल कमांड मध्ये कमांड सिन्टाक्स लहान असतात आणि यूज़र कडून वारंवार वापरल्या जातात शिवाय बूटिंग च्या वेळे मध्ये या कमांड सिस्टम मेमोरी मध्ये ही लोड केल्या जातात . उदा . Dir,Cls ,Ver ETC

एक्स्टेर्नल कमांड ह्या साइज़ ने मोठ्या आणि यूज़र कडून वारंवार वापरल्या जात नाहीत . ह्या कमांड हार्ड डिस्क किवा Floppy disk वर स्टोर केलेल्या असतात . ह्या कमांड मुळे प्रोग्राम रन करण्या साठी सोपे जाते . उदा . Fromat , Fdisk, Doskey ETC


१) Copy con :- पीसी मध्ये आपल्या नावाची फाइल बनवायची असेल तर c: ला कॉपी कोन ही कमांड आहे उदा. copy con ( File Name) आणि इंटर बटन प्रेस करावे ह्या मुळे तुम्ही जे नाव दिल आहे त्या नावाची फाइल बनाली असेल .


२) Dir :- ह्या कमांड मुळे तुम्ही बनवलेली फाइल पीसी मध्ये पाहता येते . उदा :- c:\dir आणि इंटर बटन प्रेस करावे .


३) del :- del म्हणजे डिलीट तुम्ही केलेली एखादी फाइल डिलीट करण्या साठी del ह्या कमांड चा उपयोग करतात . उदा . c:\del ( file Name)


४)rename :- ह्या कमांड मुळे तुम्ही बनवलेली आधीच्या फाइल चे नाव बदली करू शकता उदा . rename (old file name ) ( new file name )

5) Fdisk :- या कमांड मुळे हार्ड डिस्क ला पार्टीशन करता येते .

6) copy :- या कमांड मुळे आधी बनवलेल्या फाइल मधला डाटा आपल्याला दुसर्या फाइल मध्ये कॉपी करता येतो .

7) time :- या कमांड मुळे (HH:MM:SS) या सुरुपात आपण टाइम पाहू शकतो .

8) date :- या कमांड मुळे आपण पीसी मधील डेट पाहू शकतो .(MM -DD-YY)

9) cls :- ही कमांड स्क्रीन क्लेअर करण्या साठी वापरण्यात येते.

10) MD :- एम् डी म्हणजे मेक डायरेक्टरी होय म्हणजेच तुम्ही तुमच्या नावची डायरेक्टरी बनवू शकता . मग प्रशा असा पडेल फाइल म्हणजे नक्की काय फाइल म्हणजे आपण आणि डायरेक्टरी म्हणजे आपला परिवार आपले कुटुंब थोडक्यात फाइल म्हणजे आपल्या कुटुबातील व्यक्ति होय .ही कमांड उदा . md ( डायरेक्टरी नेम ) आणि इंटर बटन प्रेस करावे .

Friday, October 3, 2008

संगणक पोर्ट्स

संगणक पोर्ट्स :- बाह्य उपकरणे CPU ला जोड़ण्यासाठी जे सॉकेट वापरले जाते त्याला पोर्ट असे म्हणतात . काही पोर्ट CPU बरोबर जोडलेले असतात तर काही कार्ड बरोबर जोडलेले असतात . जे मदर बोर्ड च्या स्लोंट मध्ये घातलेली असतात .

स्टैण्डर्ड पोर्ट :- PS/2 पोर्ट हे कीबोर्ड आणि माउस साठी फिक्स्ड पोर्ट असतात. नोर्मल पोर्ट हे जुन्या पीसीला असतात ज्यात कीबोर्ड तर माउस सीरियल पोर्टला जोडले जाते .

सीरियल पोर्ट्स :- माउस , कीबोर्ड मोडेम आणि CPU मधील अनेक उपकरणे जोडण्या साठी ह्या प्रकारच्या पोर्ट चा उपयोग होतो . सीरियल पोर्ट्स द्वारे एक वेळेस एक बीट डाटा पाठवला जातो आणि लांब ठिकाणी माहिती पाठवण्यासाठी सीरियल पोर्ट्स फायदेशीर ठरते .

प्यारेलल पोर्ट्स ( Parallel Ports ) :- जवळच्या अंतरावर मोठ्या प्रमाणात डाटा ने - आण करण्यासाठी बाह्य उपकरणे लावली जातात . ही पोर्ट ८ समांतर तरवारून ८ बिटचा डाटा एकाच वेळी पाठवतात . प्रिंटर पीसीला जोडण्यासाठी अश्या पोर्ट चा उपयोग करतात .

यु .एस. बी. पोर्ट (Universal Serial Bus ) :- हा पोर्ट आता हळु सीरियल आणि परल्लेल पोर्ट ची जागा घेत आहे . USB पोर्ट अतिशय वेगवान असतो . हां एक पोर्ट अनेक उपकरणे जोड़ण्या साठी उपयोगात येतो. USB १.१ मध्ये डाटा ट्रान्सफर करण्याचा वेग १२ एम् बीट्स आहे आणि USB २.० मध्ये हां स्पीड ४८० एम् बीट्स डाटा पर सेकंड ट्रान्सफर करण्यासाठी उपयोगात येतो . या स्पीडला हाई परफॉर्मेंस सीरियल पोर्ट असे ही म्हणतात .पेन ड्राइव , माउस , कीबोर्ड , वेबकैमरा, डिजीटल कैमरा , हंडीकैमरा व् अन्य उपकरणे ह्या पोर्ट ला जोडतात.



जॉयस्टिक पोर्ट :- संगणक खेळ मध्ये जॉयस्टिक हे लोकप्रिय आहे . जॉयस्टिक माध्यमातुन वेग , दाब , दिशा यावर नियंत्रण ठेवून संगणक गमेसची म़जा लुटता येते . विशिष्ट कमांड्स किवा बटन, ट्रिगर या सारखे याला उपकरणे असतात .

VGA पोर्ट :- ह्या पोर्ट ला CPU च्या मदर बोर्ड वरुन निघालेले आउट पुट मॉनिटर च्या इनपुट ला जोडले जाते.

नेटवर्क पोर्ट :- ह्या पोर्ट ला नेटवर्क केबल (CAT-5) केबल जोडली जाते .

संगणक कार्डस

व्हिडीओ कार्ड :- याना ग्राफिक्स कार्ड ही म्हणतात अशा प्रकारचे कार्ड CPU चे आउट पुट मॉनिटर वर दाखवण्या साठी आपल काम करतात . हे कार्ड CUP मध्ये जोडलेले असते . इलेक्ट्रानिक्स संदेश चे व्हिडीओ मध्ये रूपांतरण करण्याच काम हे व्हिडीओ कार्ड करतात यामुळे आपण दृश मॉनिटर वर पाहू शकतो . याला डिसप्ले कार्ड्स देखिल म्हणतात .


साउंड कार्ड :- ही कार्ड मायक्रो फोन द्वारे इनपुट घेतात आणि त्याना संगणक प्रक्रिया करू शकेल अशा रितीने रूपांतरित करतात , तसेच ही कार्ड्स अंतर्गत इलेक्ट्रानिक्स संदेशाचे ऑडियो संदेशात रूपांतरण करतात. ज्या मुळे आपणास संगणकातुन संगीत ऐकायला येते . ह्या कार्ड शिवाय संगणका मधून ध्वनी ऐकायला येत नाही . माइक देखिल ह्याला आपण कनेक्ट करू शकतो ज्यामुळे आपण माइक मध्ये हे बोलू ते संगणकाच्या स्पीकर वर ऐकायला येते .



टीव्ही टुनेर कार्ड :- आता तुम्ही टीवी देखिल पीसी वर बघू शकतो .शिवाय एखादा व्हिडीओ देखिल कैपचर म्हणजे रिकॉर्ड करू शकतो . त्याच वेळेस तुम्ही पीसी वर दुसरे काम ही करू शकता . या कार्ड्स ला टेलेव्हीजन बोर्ड , व्हिडीओ रेकॉर्डर कार्ड्स आणि व्हिडीओ कैपचर कार्ड्स ही म्हणतात . यात टीवी टुनेर आणि व्हिडीओ कनवर्ट असतो त्या मुळे टीवी चा संदेशाचे रूपांतर होवून संगणकाच्या मॉनिटर वर दिसते . टीव्ही टुनेर कार्ड मध्ये २ प्रकार आहेत एक अंतर्गत आणि बाह्य . अंतर्गत मध्ये हे कार्ड CPU च्या आता म्हणजेच मदर बोर्ड वर बसवलेले असते . जो पर्यंत पीसी सुरु नाही तो पर्यंत आपण टीवी मॉनिटर वर पाहु शकत नाही म्हणजेच टीवी बघायला देखिल पीसी सुरु करणे गरजेच असत . याच एक विशिष्ट आहे की आपण जर घरात नसलो आणि एखादा टीवी वरचा कार्यकर्म रिकॉर्ड म्हणजेच सग्रहित करायच असेल तर आपण तो टाइम सेट करून करू शकतो .


ऐक्सटेर्नल कार्ड ह्या मध्ये बाह्य स्वरूपात मोडम प्रमाणे टीवी टुनेर कार्ड असते . एखाद्या बॉक्स प्रमाणे टीवी टुनेर कार्ड दिसते . अशा कार्ड मध्ये वेगळी पॉवर सप्लाई ह्या कार्ड ला द्यावी लागते. हयात आपल्याला हवा असणारा कार्यक्रम किवा व्हीडीओ रिकॉर्ड करता येत नाही . परन्तु ह्या कार्ड च एक वैशिष्ठ आहे की टीवी बघण्यासाठी आपल्याला पीसी सुरु करण्याची गरज भासत नाही . केवल मॉनिटर च्या सहयाने आपण संगणकाच्या मॉनिटर वर टीवी पाहु शकतो. दोन्ही प्रकारच्या टीव्ही टुनेर कार्ड सोबत टीवी प्रमाणे रिमोट कण्ट्रोल मिळतो.

Thursday, September 25, 2008

संगणक चालू/बंद कसा करावा ?

संगणक सुरु करण्यासाठी प्रथम त्याचे पॉवर सप्लाई बटन सुरु करावे. नतर CPU मधील बटन प्रेस करावे जेन्हे करून CPU सुरु होइल. CPU सुरु झाला की नाही हे ON/OFF बटनाच्या बाजुच्याला असणार्या लाईट वरून समजते .

संगणकाचा विद्युत् पुरवठा बंद करण्या पूर्वी आपला संगणका एक विशिष्ट प्रक्रियेने बंद करावा लागतो. त्या प्रक्रियेस Shut Down असे म्हणतात. विन्डोज़ वापरताना शट डाउन प्रक्रिया न करता संगणक बंद केल्यास विन्डोज़ मधल्या अनेक फाइल डिलीट होण्याची शक्यता असते. म्हणुन विन्डोज़ वापरताना शट डाउन प्रक्रिया करणे गरजेच आहे .

संगणक शट डाउन करण्यासाठी ?
१) टास्क बार वरील स्टार्ट (Start) या बटनावर क्लिक करावे .
२) स्टार्ट (Start) मेनू मधील शट डाउन (Shut Down ) या आप्शन वर क्लिक करावे .
३) स्क्रीन वर Shut Down ची विन्डोज़ दिसेल ।




शट डाउन (Shut Down ) या विन्डोज़ मध्ये चार पर्याय असतात.

१) स्टैंड बाय (Stand By) :-

संगणक पूर्ण बंद न करता थाबायाचे असेल तर स्टैंड बाय या पर्ययाचा उपयोग होतो या कमांड मुळे स्क्रीन पूर्णपणे Blank होते. परन्तु माउस हलवून किवा कीबोर्ड च्या सहाय्याने स्क्रीन वरील माहिती तत्काल पाहू शकतो .

२) शट डाउन (Shut Down ) :-

आपले काम संपले व आपणास संगणक बंद करायचा असेल तर शट डाउन (Shut Down ) या आप्शन वर क्लिक करावे click केल्यावर " Its Now Safe To Turn Off Your Computer " असा संदेश आला की आपण संगणकाच्या बंद करू शकतो .

३) रिस्टार्ट (Restart) :- काही वेळास एखाद्या विशिष्ट प्रोग्राम बंद पडला असेल किवा संगणक हैक झाला असेल तर अशा स्थितीत संगणक पुन्हा सुरु करण्यासाठी रिस्टार्ट (Restart) हा पर्याय सेलेक्ट करावा आणि नतर YES हे बटन क्लिक करावे .

४) रिस्टार्ट इन एम्. एस.डॉस.मोड़ :- आपणास डॉस वरील प्रोग्राम वापरायचे असतील तर हा पर्याय निवडून ओके बटन क्लिक करावे .

Saturday, September 20, 2008

पीसी मेंटनन्स

आपणास माहित आहे की ज्या वस्तूची आपण ज्यास्त काळजी घेतो ती वस्तु ज्यास्त काळ टिकते . संगणका चे ही तसेच आहे . ज़र पीसी च्या आजुबाजुला खुप धूळ व कचरा असेल आणि वातावरण दमट असेल तर पीसी च्या आतील नीट चालेल याची खात्री खुप कमी होते . जसे स्वच्छ , धुळ नसलेल्या गार शांत जास्त दमट पणा नको असे वातावरण पीसी च्या भोवती असले पाहिजे . या मुळे आपली आणि पीसी ची ही condiction चागली राहते. पीसी जर बंद पडू नये असे वाटत असेल तर त्याच्या मेंटनन्ससाठी काही वेळ देण गरजेच आहे .

पीसी मेंटनन्स कसा करावा ?

१) सर्व डाटा बेक अप घ्यावा .
२) पीसी , मॉनिटर , कीबोर्ड . माउस , प्रिंटर स्वच्छ करावा .
३) सर्व लीड्स आणि केबल्स फुल्ली सोक्केट मध्ये Secured आहेत की नाही ते चेक करावे .
४) स्वच्छ कपडा घेवून त्यावर क्लेअरिंग सॉल्यूशन घेवून कैबिनेट , मॉनिटर कीबोर्ड अन्य स्वच्छ करावा .
५) केबल कनेक्शन मुळे पीसी ला प्रोब्लेम्स येवू शकतो या मुळे सोक्केट , पॉवर सप्लाई प्लग नीट चेक करावा .
६) पीसी ला अर्थिंग नसल्या मुळे Shock लागु शकतो यामुळे पीसी चे पार्ट डैमेज होवू शकतात .अर्थिंगचेक करावी नसेल तर अर्थिंग लावून बसवून घ्यावी .
७) व्याक्युम मशीन में डस्ट काढून घ्यावी .
८) पीसी च्या वर पीसी कवर अथवा कपडा टाकावा ज्या मुळे डस्ट पीसी वर बसत नाही .
९) हे सर्व करताना पीसी बंद करण गरजेच आहे . म्हणजेच पीसी ची पॉवर सप्लाई काढली पाहिजे .

प्रोब्लेम्स आणि सोलुशन्स

प्रोब्लेम्स आणि सोलुशन्स !
माउस नीट चालत नसेल तर ?

१) माउस साफ़ करावा .
माउस च्या खालील बाजुस असलेला फ्लाप (cover) काढून आतील रबरी Ball काढून स्वच्छ करावा . माउस मधील रोलर वर चिकटलेली धुळ काढावी .
२) रोलर फिरत नसले तर माउस बदलावा.
३) माउस चा पोर्ट चेक करावा . तो CPU मध्ये नीट कनेक्ट झाला आहे की नाही ते पाहावे .
४) केबल मध्येच ब्रोकेन झाली असली तरी माउस चालत नाही .
५) पीसी रिस्टार्ट करावा जेन्हे करून जर तात्पुरता प्रॉब्लम असले तर माउस परत नीट चालतो .
सूचना :- हे सर्व करताना पीसी बंद करण गरजेच आहे .

कीबोर्ड चालताच नसेल तर ?

१) सर्व प्रथम त्याचा कनेक्टर , केबल चेक करावी .
२) पीसी रिस्टार्ट करावा जेन्हे करून जर तात्पुरता प्रॉब्लम असले तर कीबोर्ड परत नीट चालतो .
३) कीबोर्ड चे लाक् (LOCK)चेक करावे .
४) किबोर्ड बटन साफ़ कराव्यात .
सूचना :- हे सर्व करताना पीसी बंद करण गरजेच आहे .

पीसी सारखा रिस्टार्ट होत असेल तर ?

१) पॉवर कनेक्शन चेक करावे .
२) लो वोल्टेज मुळे पीसी रिस्टार्ट होत असेल .
३) पीसी मध्ये काही फाइल डिलीट झाल्या असतील .
४) Ram काढून परत स्वच्छ करून CPU मध्ये लावावी.
५) वाइरस मुळे ही पीसी सारखा सारखा रिस्टार्ट होत असेल .
६) SMPS चा ही प्रोब्लेम्स असू शकतो .

७) सॉफ्टवेर चा लोड पीसी घेत नसेल .
सूचना :- हे सर्व करताना पीसी बंद करण गरजेच आहे .


पीसी स्लो (Slow) झाला असेल तर ?
१) पीसी मधील नको असलेल्या फाइल्स डिलीट करावेत .
२) अनवांटेड डाटा काढून टाकावा किवा नको ते प्रोग्राम्स करून टाकावे.
३) पीसी एंटी वायरस सॉफ्टवेर ने स्कैन करून पाहावे .
४) Disk Defragmenter पीसी करून पाहावे ह्या मुळे पीसी मधील डाटा हार्डडिस्क मध्ये सेट होतो ह्या मुळे पीसी फास्ट चालतो .हे करण्या साठी स्टार्ट मेनू वर क्लिक करून प्रोग्राम्स मध्ये Accessories वर क्लिक करून System Tools ह्या आप्शन मध्ये हा आप्शन आहे .
5) अन्यथा पीसी फॉर्मेट करावा .

इंटरनेट (Internet)

१९६९ मध्ये अमेरिकेने अनुदान दिलेल्या एका प्रोजेक्टरने इंटरनेशनल संगणक नेटवर्क विकसित केले . जगातील छोट्या नेटवर्क ला जोडणारे नेटवर्क म्हणजे इंटरनेट होय . १९९२ मध्ये स्वित्झलंड येथे सेंटर फॉर उरोपिन न्यूक्लिअर रिसर्च मधून (CERN) वेब अर्थात वर्ल्ड वाइड वेब (www) आपल्या पर्यंत पोहचले . ह्याच्या पूर्वी इंटरनेट म्हणजे ग्राफिक्स , एनीमेशन , ध्वनी व्हिडिओ इंटरफेस नसलेल माध्यम होते . वेब मुळे ह्या सर्व गोष्टी नेट वर पहाणे शक्य झाले . आणि इंटरनेट २१ व्या शतकातील एक मेकांच्या सपर्काचे प्रभावी साधन बनले. इंटरनेट वायर, केबल, सॅटॅलाइट यांच्याशी जोडून बनले आहे . तर वेब इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या डाटा सही जोडून देतो ते वेब .इंटरनेट चा वापर खलील गोष्टी साठी सामान्यत केला जातो.

सपर्क :- इंटरनेट द्वारे केलि जाणारी ही एक लोकप्रिय बाब आहे . तुम्ही ईमेल च्या द्वारे तुम्ही कुठल्या ही जगातील व्यक्तिशी संपर्क साधू शकता . आवडीच्या विषयावर चर्चा करण्यासाठी भाग घेवू शकता इतकेच नाही तर तुम्ही स्वतच वेब पेज म्हणजेच वेब साईट ही बनवू शकता .

शोपिंग :- इंटरनेट च्या माध्यमातून तुम्ही शोपिंग करू शकता किवा एखादी वस्तु विकू ही शकता . बाजारात आलेल्या नविन वस्तुंची माहिती नेट मुळे आपणास बघायला मीळते. एलेक्ट्रोनिस्क कार्ड किवा डेबिट कार्ड वापरून तुम्ही ही खरेदी करू शकता .



सर्चिंग :- एखाद्या विषयावर माहिती शोधणे इंटरनेट मुळे सोपे झाले आहे . जगातील कुठल्या ही वस्तूची अथवा गोष्टीची माहिती हवी असल्यास ती आपणास इंटरनेट मुळे मीळु शकते . शिवाय इ-बुक मुळे कुठल्या ही ग्रंथालायाची बुक्स, पुस्तके आपणास नेट वर फ्री मध्ये वाचायला भेटतात . शिवाय ऑनलाइन न्यूज़ ही वाचायला किवा व्हीडीओ द्वारे बघायला मीळते. उदा . http://www.starmajha.com/ मग लगेच स्टार माझा न्यूज़ चेनल वेब पेज तुमच्या स्क्रीन वर ओपन होइल . त्यात न्यूज़ बातम्या संदर्भामधील माहिती आपण पाहू शकतो .

मनोरंजन :- या विषयावर सांगाव तेवढ कमी आहे कारण या विषयावर इंटरनेट वर भरपूर माहितींचा खजाना आहे . संगीत , चित्रपट , मासिक तसेच आता ऑनलाइन चित्रपट ही आपण नेटवर पाहू शकतो . सध्या ऑनलाइन गेम्स ही नेट वर उपलब्ध आहेत .

इंटरनेट आणि दूरध्वनी या दोन्ही यंत्रणा सारख्याच आहेत जश्या प्रकारे टेलेफोन ला टेलेफोन ची केबल जोडली जाते तशाच प्रकारे संगणकालाही इंटरनेट जोडले जाते . इंटरनेट ज्या वेळेस तुमच्या संगणका सोबत जोडले जाते तेव्हा तुमचा संगणक हा जगातील भल्या मोठ्या संगणकाचा भाग बनतो कारण त्या वेळेस आपण जगातील कुठल्याही ठिकाणी नेट माध्यमातून जावू शकतो .गूगल अर्थ एक अस इंटरनेट वरील साईट आहे की कुठल्या ही देशा मधून फोटो आपण पाहू शकतो . इंटरनेट बरोबर जोड़नी करण्यासाठी इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर्स (ISP) हे आपल्याला इंटरनेट जोड़नी साठी एक्सेस देते . हा एक्सेस लोकल नेटवर्क माध्यमातून किवा टेलेफोन माध्यमातुन असतो . बिनतारी म्हणजेच वायरलेस कनेक्शन इंटरनेट चे मोडेम मुळे मीळते.


इंटरनेट कनेक्ट होण्यासाठी संगणक ब्राउजर्स असणे गरजेच असत . यात माइक्रोसॉफ्ट इंटरनेट हे खुप लोकप्रिय ब्राउजर्स आहेत . संगणकाच्या डेस्कटॉप आणि प्रोग्राम्स मध्ये हे ब्राउजर्स आहेत . वेबसाइट चे नाव किवा URL ( यूनीफोर्म रिसोर्स लोकेटर्स ) माहिती असणे गरजेच आहे . सगणका मधील डाटा ची देवाण घेवाण करण्यासाठी वापरत येणार्या नियमाना प्रोटोकॉल असे म्हणतात. http:// हा सर्वसाधारण वापरात येणारा प्रोटोकॉल आहे . तर .com (.कॉम) म्हणजे कोमुनिकेशन होय.

सॉफ्टवेर (Software)

सॉफ्टवेर म्हणजे संगणकावर वापरला जाणारा प्रोग्राम होय . या प्रोग्राम द्वारे विशिष्ट कमांड देवूण तसेच विशिष्ट माहिती देवून आपणास हवे ते आउट पुट मिळवता येते . सॉफ्टवेर ही काँम्प्यूटर वापरताना लागणारी आवशक गोष्ट आहे . संगणकाच्या हार्डवेयर डिवाइस ला आपण ज्या वेग वेगळ्या कमांड आणि सुचना देतो . त्या कमांड आणि सूचना देण्यासाठी काही विशिष्ट प्रोग्राम्स ची गरज असते . या प्रोग्राम्स ला संगणकाचे सॉफ्टवेर असे म्हणतात .
सॉफ्टवेर चे पुढील भाग पडतात .
१) अप्लिकेशन सॉफ्टवेर :-
अप्लिकेशन सॉफ्टवेर म्हणजे संगणका चा उपयोग करून घेताना त्या पासून रिजल्ट मिळू शकतो असा सॉफ्टवेर . याला पेकेज (Packege ) ही म्हणतात . उदा .वर्ड , एक्सेल यात लेटर फोर्मेटिंग , किवा अजुन खुप काही करण अशा सॉफ्टवेर मुळे शक्य होते .थोडक्यात संगणका कडून एखाद्या ऑफिस चे काम डिजाईन करण्यासाठी अशी सॉफ्टवेर बनवून घेतली जातात .

२) डेवलेपमेंट सोफ्टवेर :-
डेवलेपमेंट सोफ्टवेर याला Languages सॉफ्टवेर म्हणतात . आपण या आधी पाहिले की अप्लिकेशन सॉफ्टवेर म्हणजे संगणका चा उपयोग करून घेताना त्या पासून रिजल्ट मिलावी शकतो परन्तु हे रिजल्ट देण्यासाठी काँम्प्यूटरला सागणारा ही कोणीतरी असतो . वेग वेग वेगळ्या भाषेत संगणकाच्या वेगवेगळ्या भागाना समजेल अशी सूचना देण्याच काम डेवलेपमेंट सोफ्टवेर करते . या मध्ये बेसिक ,कोबोल , सी , सी ++ विज्युअल बेसिक सॉफ्टवेर येतात .

३) ऑपरेटिंग सिस्टम :-
संगणकाचा आणि काम करणार्या व्यक्तीचा संगणकाशी सुस्वाद व्हावा या साठी कोणत्या तरी माध्यमाची गरज असते . हा सवाद प्रोग्राम्स च्या माध्यमातून साधला जातो त्या प्रोग्रामला ऑपरेटिंग सिस्टम असे म्हणतात किवा OS देखिल म्हणतात . डॉस , यूनिक्स , विन्डोज़ , एप्पल सारख्या ऑपरेटिंग सिस्टम आहेत .

Friday, September 19, 2008

ऑपरेटिंग सिस्टम (OS)

संगणकाचा आणि काम करणार्या व्यक्तीचा संगणकाशी सुस्वाद व्हावा या साठी कोणत्या तरी माध्यमाची गरज असते . हा सवाद प्रोग्राम्स च्या माध्यमातून साधला जातो त्या प्रोग्रामला ऑपरेटिंग सिस्टम असे म्हणतात किवा OS देखिल म्हणतात . डॉस , यूनिक्स , विन्डोज़ , एप्पल सारख्या ऑपरेटिंग सिस्टम आहेत .
ऑपरेटिंग सिस्टम हा सॉफ्टवेर चा महत्वाचा भाग आहे . आपल्या कड़े ज़र वर्ड , एक्सेल , ऑटोकाड, फोटोशॉप, टेल्ली या सारखे पकेज असले तरी ऑपरेटिंग सिस्टम शिवाय हे पेकजे आपण वापरू शकत नाही. ऑपरेटिंग सिस्टम मध्ये आपले कड़े विन्डोज़ नावाची ऑपरेटिंग सिस्टम लोकप्रिय आहे . सध्या ह्या ऑपरेटिंग सिस्टम चे भाग विन98 , विन2000, विनXP, विन विस्टा ह्या लोकप्रिय आहेत . जास्त वापरत आहेत .

विन्डोज़ XP साठी लागणारे आवशक कॉन्फिगुरेशन :

प्रोसेसर :- कमीतकमी P-1 , 233MHZ , Ram :- 128 MB कमीत कमी 64MB ,

हार्ड डिस्क :- १.5 GB , ड्राइव :- Cd रोम

मॉनिटर :- S-VGA मॉनिटर , अन्य :- कीबोर्ड , माउस

स्कैनर + स्पीकर

स्कैनर :- स्कैन केलेली माहिती आणि तीची प्रतिमा सिस्टिम युनिट मध्ये प्रक्रिया करू शकेल अशा भाषेत रूपांतरित करण्याच काम स्कैनर करते . स्कैनिंग उपकरणे ३ प्रकारची आहते ओप्टिकल स्कैनर , बार कोड स्कैनर आणि अक्षरे व चिन्हे ओळखणारी उपकरणे .
ओप्टिकल स्कैनर :- याना नुसते स्कैनर असे म्हणतात .माहिती आणि इमेज म्हणजेच प्रतिमा सिस्टिमला वाचता येइल अशा स्वरूपात स्कैन म्हणजे प्रक्रिया करून देतात . ओप्टिकल स्कैनर ला अक्षरे किवा प्रतिमा समजत नाहीत तर अक्षरे आणि प्रतिमा तयार करण्यासाठी प्रकाश , अंधार आणि रग बेरंगी आकर मात्र स्कैनर ला समजतात . स्कैन केलेली माहिती फाइल रुपात संगणका मध्ये साठवली जाते . ती वाचता अथवा प्रिंट ही करता येते . ओप्टिकल स्कैनर चे ही २ प्रकार आहेत
१) फ्लैटबेड स्कैनर :- हयात एखाद्या पेज च्या प्रति बनवण्या साठी स्कैनर च्या काचेवर ते पेज ठेवले जाते तो ते स्कैन करतो.
२) पोर्टेबल स्कैनर :- हे हातात धरून स्कैन करण्याचे उपकरण आहे ,
बार कोड स्कैनर रीडर :- आपण मोठ्या दुकानात किवा शोपिंग मोंल मध्ये अशा प्रकारचे स्कैनर पाहिले असेल अशा प्रकारचे स्कैनर हातात धरून स्कैन केले जाते. काही रीडर विशिष्ट जागी बसवले जाते
त्यानां फ्लैट फॉर्म रीडर असे म्हणतात . त्यात स्कैन केलेले कोड संगणका मध्ये पाठवले जाते त्यात वजन , कीमत आणि वस्तूची उपलब्धी ह्या सर्व माहिती साठवल्या जातात. स्कैनर माहितीची पड़ताळणी करून वस्तूची ताजी माहिती इलेक्टिकल कैश रजिस्टर्ला देतो . हयात वास्तुच्या किमतीचा तपशील ही असतो .
अक्षरे आणि चिन्हे ओळखणारी स्कैनर :- अशा स्वरुपाची स्कैनर अक्षरे आणि चिन्हे ओळखण्यासाठी येतात . विशिष्ट उद्देश साठी अशी स्कैनर वापरली जातात . बैंक मध्ये चेक वर ची अक्षरे ओळखण्यासाठी तसेच पेन्सिल ने केलेली खून ही अनेक पर्याय मधून निवडली आहे का नाही त्या नुसार गुण मोजणी साठी हे उपयोगी पडतात ह्या मध्ये ३ प्रकार आहेत . MICR , OCR, OMR.