Friday, September 19, 2008

वेब कैमरा + पेन ड्राइव

वेब कैमरा

आपण सिनेमात पाहील असले ही हीरो हिरोइन बरोबर चाटिंग करत आहे आणि ती हिरोइन त्याला चाटिंग करताना एक विंडो मध्ये मोनिटर च्या स्क्रीन वर हिरोइन लाइव चित्र रुपात दिसत आहे. ह्याला कारण की ती वेब कैमरा समोर बसली आहे . त्यामुळे वेब कैमरा समोर जे चित्र येइल ते दुसर्या व्यक्तीला दिसेल . वेब कैमरा हा एक विडियो शूटिंग कैमरा सारखा असतो . त्याने शूटिंग करून जे रिकॉर्डिंग केले आहे त्याचे आउट पुट आपणास मोनिटर च्या स्क्रीन वर बघायला मीळतो. वेब कैमरा त्याच्या मेगा पिक्सेल पाहून घेतला जातो जेवढे जास्त मेगा पिक्सेल तेवढा क्लेअर विडियो मीळतो. घरा मधील छोट्या मोठ्या कार्यक्रमाची शूटिंग आपण वेब कैमराने घेवू शकतो . वेब कैमरा USB पोअर्टला जोडला जातो .



पेन ड्राइव :-

CD मध्ये डाटा स्टोर करायला CD राईटर लागतो. ज्या ठिकाणी CD राईटर नाही त्या ठिकाणी डाटा कॉपी करण कठिण जात . फ्लोप्पी मध्ये खुप कमी डाटा स्टोर करता येतो म्हणुन फ्लोप्पी चा उपयोग जास्त मोठा डाटा कॉपी करण्यासाठी येत नाही . अशा वेळेस पेन ड्राइव हे अतिशय उपयुक्त साधन आहे .पेन ड्राइव मधे 256MB पासून ते सध्या 8GB पर्यंत साइज़ असणारे पेन ड्राइव उपलब्ध झाले आहेत . या मध्ये डाटा कॉपी करण ही अतिशय सोप आहे . ज्याप्रमाने आपण एखादी फाइल पीसी मध्ये कॉपी करून दुसरीकडे पेस्ट करतो त्याच प्रमाने पेन ड्राइव मध्ये आपण डाटा पेस्ट अथवा कॉपी करू शकतो .पेन ड्राइव USB पोर्ट ला जोडला जातो . पीसी ला जोडून आपणास पेन ड्राइव एक्सेस करायचा असल्यास माय कॉम्प्युटर आपण ओपन करून त्यात C: ड्राइव सारखा दुसर्या नावाचा पेन ड्राइवचा ड्राइव ओपन होतो . पेन ड्राइव मध्ये आता MP3 प्लेयर देखिल आले आहते ज्यामुळे आपण त्याचा २ प्रकारासाठी वापर करू शकतो . गाणी श्रवण करण्यासाठी आणि डाटा कॉपी करण्यासाठी .

मोडेम

मोडेम म्हणजे संगणका मधली महितींची देवाण-घेवाण डिजीटल सिग्नल मधून करायची असते तेव्हा मोडेम ची गरज भासते . डिजीटल सिग्नल टेलेफोनच्या अनोलोग सिग्नल मधून जावू शकत नाही . म्हणजेच टेलेफ़ोनच्या लाइन मधून सन्देश एका संगणका मधून दुसर्या संगणका मध्ये पाठवायाचा असतो . तेव्हा मोडेम चा वापर करतात . संगणका मधून येणारा सिग्नल हा डिजीटल असतो तो मोडेमच्या सहाय्याने अनोलोग केला जातो. डिजीटल सिग्नल चे रूपांतर एनोलोग सिग्नल मध्ये केला जातो त्या रूपांतर करणारया क्रियेला मोडूलेशन असे म्हणतात .

याच्या उलट एनोलोग सिग्नलचे रूपांतर डिजीटल सिग्नल मध्ये केला जातो तय रूपांतर करणारया क्रियेला डीमोडूलेशन असे म्हणतात. ही क्रिया मोडेम हे करते . मोडेमचे दोन प्रकार पडतात . बाह्य मोडेम आणि अंतगर्त मोडेम



१) बाह्य मोडेम (External) :- जेव्हा मोडेम संगणकाला बाहेरून जोडले जाते . तेव्हा त्याला बाह्य मोडेम असे म्हणतात . एका बाजूने मोडेम संगणकाला जोडला असतो दुसर्या बाजूने मोडेम टेलेफोन लाइनला जोडला असतो .
2) अंतगर्त मोडेम (Internal) :- जेव्हा मोडेम संगणकाच्या CPU मध्ये मदर बोर्डला जोडले जाते . तेव्हा त्याला अंतगर्त मोडेम असे म्हणतात . फ़क्त मोडेमला टेलेफोने लाइन जोडली असते .

मोडेम चा उपयोग प्रामुख्याने इंटरनेट करता केला जातो. मोडेम मधून डाटा मोजन्यासाठी एकक बीट्स पर सेकंड (bps) या परिमाण घेतले जाते. हल्लिचे मोडेम ५६ kbps स्पीड चे आहेत .

लैपटॉप मध्ये इन्टरनेटसाठी मोबाइल कंपनीचे डाटा कार्ड उपलब्ध झाले आहेत . टाटा , रिलायंस , तशेच अन्य डाटा कार्ड उपलब्ध जाले आहेत .

संगणकाचे नेटवर्क

दोन किवा त्या पेक्षा जास्त संगणक एकमेकाना जोडून केलेली रचना त्याला संगणकाचे नेटवर्क असे म्हणतात . नेटवर्क मध्ये माहितीची देवाण घेवाण करता येवू शकते . नेटवर्क मधील संगणक आवश्कते नुसार वेग वेगळे प्रोग्राम्स किवा हार्डवेयर एकत्रित वापरणे सोइस्कर ठरते . नेटवर्क मध्ये १ सर्वर बनवला जातो. त्याला बाकीचे पीसी जोडले जातात . थोडक्यात म्हणजे हार्डवेयर पार्ट्स कडून मिळणारया सर्विसेस आणि इन्फोर्मेशन शेयर करणे होय.

संगणकाचे नेटवर्क च्यामुले आपलस खलील फायदे होतात .

१) शरिंग ऑफ़ डाटा :- एका पेक्षाजास्त संगणका ची माहिती शेयर करता येते , यामुळे ऑफिस मधील एखाद्या डिपार्टमेटल मधील माहिती जशाच तसे एखाद्या लाब अतरावरील संगणका वर घेण किवा पाहणे शक्य होते ,पर्यायाने वेळ आणि श्रमाची बचत होते.

2) शरिंग ऑफ़ डीव्हाईस:-एका पेक्षा जास्त संगणकाला एखादे डीव्हाईस शेयर करणे शक्य होते. उदा.प्रिंटर,स्कैनर

३) Communication :- एकाच वेळे मध्ये अनेक संगणकाच्या बरोबर संदेश देवान घेवाण करण शक्य होते .

प्रतेक ऑफिस मध्ये १ तरी सर्वर असतो .इन्टरनेट एक्सेस करण्यासाठी ही प्रॉक्सी सर्वर असतो ज्याला आईपी एड्रेस दिला जातो . तो आईपी एड्रेस टकला की ज्यात आईपी एड्रेस टाकला आहे त्या पीसी मध्ये इन्टरनेट सुरु होते . ह्या मध्ये URL ही देता येते जेन्हे करुण इन्टरनेट एक्सेस होते . नेटवर्क मुळे जरी डाटा एक्सेस करण सोप झाल असले तरी ह्याच्या अनेक प्रोब्लेम्स ही आहेत . एक म्हणजे वाइरस प्रॉब्लम . वाइरस म्हणजे exe फाइल ह्या फाइल मुळे डाटा लॉस होत जरी नसला तरी वाइरस पीसी च्या System फाइल डिलीट करतो ह्या मुळे पीसी ला प्रॉब्लम होतो .

नेटवर्क मुळे डाटा सफे रहत नाही कुणाचा ही डाटा कुणी बघू शकतो . जर शेरिंग काढली तर डाटा कुणीही एक्सेस करू शकत नाही. नेटवर्क ला विशिष्ट कोड किवा पासवर्ड देण खुप गरजेच असत . करण जर नेटवर्क जर ओपन राहिले तर कुणीही ते एक्सेस करू शकते त्याचा दूर उपयोग होवू शकतो . किवा नेटवर्क हैक होवू शकते . हल्ली अतेरिकी ह्याचा फायदा घेवून दुसर्याच्या नेटवर्क हैक करुण ईमेल पाठवतात .वायरलेस नेटवर्क ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी केबल ची गरज लगत नाही . वायरलेस मार्फ़त पीसी नेटवर्क मध्ये सेटिंग करून जोड़ता येतो . नेटवर्क मुळे सर्वात जास्त फायदा झाला तो म्हणजे ऑफिस मध्ये नेटवर्क प्रिंटरचा एकाच प्रिंटर मध्ये नेटवर्क मध्ये जोडलेल्या पीसी मधून प्रिंट देण शक्य झाल यामुळे प्रिंटरचा खर्च ही वाचतो शिवाय जागा ही वाचते नेटवर्कची जोड़णी राउटर , हब , स्विच, सेटलाईट किवा मोडेमला जोडून नेट्वर्किंग केले जाते जाते . CAT 5 केबल , ऑप्टिक फाइबर केबल द्वारे नेट्वर्किंग केले जाते .

नेटवर्क चे वर्गीकरण नेटवर्कचा आकार आणि रचना यांच्या आधारे केला जातो यावरून नेटवर्क चे ३ प्रकार पडतात .

१) लोकल एरिया नेटवर्क (LAN) :-

एकाच इमारती मधील किवा विभागातील संगणक एकमेकाना जोडले जातात त्याला लोकल एरिया नेटवर्क असे म्हणतात . या नेटवर्क मध्ये संगणक एकमेकाशी एकाच प्रकारच्या केबलने जोडलेले असतात . नेटवर्क मध्ये संगणकाची जोड़णी कमी असते . नेट वर्क च्या बाकीचा प्रकारा पेक्षा हे नेटवर्क स्वस्त असते LAN मध्ये LAN कार्ड आणि केबल आवशक असते. LAN १० किलो मीटर च्या कमी अंतरा साठी वापरले जाते .

२) मेट्रोपोलिटन एरिया नेटवर्क (MAN) :-

हे नेटवर्क LAN पेक्षा मोठे असते . मेट्रोपोलिटन एरिया नेटवर्क पूर्ण सिटी शहरात जोडले जाते . या नेटवर्क मध्ये वेगवेगळ्या केबलचा वापर केला जातो. एखाद्या मोबाइल कंपनीचे एखाद्या सिटी मधील वेगवेगळ्या भागात ह्या मुळे शक्य होते. टेलेफोन किवा रेडियो चे नेटवर्क म्हणजे MAN नेटवर्क होय .

3)वाइड एरिया नेटवर्क (WAN) :- जेव्हा दोन शहरातील नेटवर्क एकमेकाना जोडले जाते त्या नेटवर्कला वाइड एरिया नेटवर्क असे म्हणतात . या नेटवर्क मध्ये टेलेफोन लाइनचा किवा उपग्रहाच्या मार्फ़त सेटलाईट द्वारे जोडले जातात .

प्रिंटर

मोँनिटरच्या स्क्रीन वर जी माहिती मिळते त्यास आउटपुट असे म्हणतात .हा आउटपुट संगणक बंद केला की दिसेनासा होतो . स्क्रीन वर , हार्ड डिस्क , फ्लोपी डिस्क वर मिळणाऱ्या माहिती मध्ये पाहिजे तेव्हा बदल करता येतो म्हणुन अशा माहितीला सॉफ्ट कॉपी असे म्हणतात . संगणका मधून अशी माहिती प्रिंटर या प्रदान म्हणजेच आउटपुट डिवाइस मधून कागदावर छापता येते . प्रिंटर ने छापलेली माहिती तशीच राहते म्हणुन त्या माहितीला हार्ड कॉपी असे म्हणतात. प्रिंटर हे परेलाल किवा यूएसबी केबल द्वारे CPU मध्ये मदर बोर्ड ला जोडले जाते .

प्रिंटर चे सध्या ३ भाग प्रचलित आहेत .

1) डॉट मेट्रिक्स प्रिंटर :-
ह्या प्रिंटर मधी अक्षरे अनेक टिम्बाच्या स्वरूपात छापली जातात. गोल बारीक़ पिन्सची एक किवा दोन लाइनची मालीका असते . प्रतेक पिन स्वतन्त्र पणे शाईच्या रिबिन्वर आघात करते . त्या मुळे रिबिन्वारिल शाईचा ठपका कागदावर उमटतो . संगणकाच्या संदेशा प्रमाने पिन्स रिबिन वर जलद गतीने आघात करतात त्या मुळे कागदावर टीबाच्या स्वरूपात अक्षरे उमटतात .
डॉट मेट्रिक्स प्रिंटर हे कमी खर्चाचे असतात . पण प्रिंटिंगच्या वेळी खुप मोठा आवाज करत प्रिंटिंग करतात . बँकेच्या ठिकाणी अशाच प्रकारचे प्रिंटर वापरले जातात

२) इंक जेट प्रिंटर :-

हे प्रिंटर शाईच्या तुषार जल्द गतीने फवार्य सारखे उडतात .इंकच्या तुषार सूक्ष्म छिद्रांच्या नॉझल्सने कागदावर उडवले जातात .यात नोझल्सच्या मदतीने योग्य प्रमाणात चार प्राथमिक रंग मिसळुन रंगित प्रिंट करता येते .

३) लेझर प्रिंटर :-

हे प्रिंटर छापाईसाठी लेझर किरणांचा वापर करतात. संगणका कडून येणार्या माहिती नुसार हे लेझर किरण सतत गोल फिरणारया ड्रमवर पडली जाते . या लेझर किरण मुळे ड्रमवर स्थिर विद्युत प्रभाराचे ठिपके तयार होतात . ड्रमच्या लगत असलेली कोरडी शाईची भुकटी (टोनर) ड्रम वरील विद्युत् प्रभारित कागदावर मचकुराच्या ओळी किवा चित्राचे भाग तयार होतात .

सध्या ओल इन वन (All In One ) प्रिंटरला जास्त मागणी आहे कारण हयात सर्व प्रकारचे Function आहेत . झेरोक्स , स्कैनर , प्रिंटर , फैक्स अशा सर्व गोष्टी एकात मिळतात ह्या मुळे अशा प्रिंटरला जास्त डिमांड आहे .

मॉनिटर (Monitor)

की -बोर्डच्या मदतीने संगणकाला दिलेली माहिती ज्या दूरदर्शन संचासारख्या दिसणारया पडद्या वर उमटते त्याला "मॉनिटर" असे म्हणतात . मॉनिटर म्हणजे व्हिजुअल डीस्प्ले यूनिट असे म्हणतात किवा व्ही .डी .यु . असे ही म्हणतात . मॉनिटर संगणकाचे आउट पुट डिव्हाईस असे म्हणतात . मॉनिटरला संगणकाचे आउट पुट डीव्हाईस असे म्हणतात .

मॉनिटरचा आकार :
मॉनिटरचा आकाराचे मोजमाप त्याच्या पडद्याच्या म्हणजेच स्क्रीनच्या कर्नाच्या लांबी मध्ये केले जाते . सामान्यत बाजारात १५" , १७" , १९", २१" अश्या स्वरुपाचे मॉनिटर उपलब्ध आहेत . फ्लाट्स स्क्रीन चे मॉनिटर हल्ली जास्त प्रमाणात विकले जातात . जेवढा आकार मोठा तेवढी त्याची किंमत जास्त असते .

मॉनिटरचे प्रकार :-


इलेक्ट्रानिक्स क्षेत्रातील प्रगती मुळे विविध प्रकारचे मॉनिटर उपलब्ध झाले आहेत . मॉनिटर आकाराच्या आणि तंत्राच्या बाबती मध्ये टेलीविजन सारखेच असतात . मॉनिटर हे कैथोड रे ट्यूब पासून बनले आहेत म्हणुन त्याना CRT ( कैथोड रे ट्यूब ) असे म्हणतात .

CRT चा आकार मोठा असल्याने छोट्या आणि सूट सुटीत आकाराच्या मॉनिटर ची निर्मिती सुरु झाली . या मॉनिटरला फ्लैट स्क्रीन मॉनिटर असे म्हणतात किवा LCD म्हणजे लिक्विड क्रिस्टल डीस्प्ले असे म्हणतात . असे मॉनिटर आकाराने लहान व कमी जागा व्यापणारे असतात . परन्तु हे नोर्मल मॉनिटर पेक्षा जास्त कीमती मध्ये मिळतात . लैपटॉप ,पाम टॉप, नोट बुक मध्ये अशा स्वरुपाचे फ्लैट स्क्रीनचा वापर करतात .


पाहिले मॉनिटर हे एक रंगी असायचे त्याला मोनोक्रोम म्हणजे ब्लैक एंड व्हाइट मॉनिटर असे म्हणतात . सध्या रंगीत म्हणजेच कलर मॉनिटर वापरले जातात . ब्लैक एंड व्हाइट मॉनिटर मध्ये ब्लैक,व्हाइट, केशरी, हिरवा किवा करडा रंग वापरला जातो . तर रंगीत मॉनिटर मध्ये लाल , हिरवा , निळ्या रंगाचा वापर केला जातो .


मॉनिटर रेझोलुशन:- मोनिटर वर दिसणार्या चित्रांचा दर्जा मॉनिटरच्या रेझोलुशन वर अवलंबून असतो . मॉनिटर वर आपण जी अक्षरे , अंक , चित्र पाहतो ते लहान ठिपक्यानी बनाले असते. या ठिपक्याना पिक्सॅल असे म्हणतात . मॉनिटर वर उभ्या आणि आडव्या ओळित मांडलेले असतात . दर एकक क्षेत्र फळात जेवढे जास्त पिक्सॅल तेवढे चित्र अधिक क्लेअर मॉनिटर वर दिसते .
मॉनिटर वर दिसणारे रंग हे मदर बोर्ड वर लावलेल्या कलर ग्राफिक्स कार्ड वर अवलंबून असते . सध्या VGA आणि SVGA कार्ड उपलब्ध आहेत . सुपर व्हीडीओ ग्राफिक्स अडाप्टर आणि विडियो ग्राफिक्स अडाप्टर . सुपर सुपर विडियो ग्राफिक्स अडाप्टर मध्ये ४० लाख रंग छठा पडद्यावर दिसतात . या मध्ये पिक्सॅल जवळ असल्याने १०२४ ओळि आणि प्रतेक लाइन मध्ये १२८० पिक्सॅल असतात . पिक्सॅलची सख्या वाढली का आकारमान कमी होते . आणि चित्र अधिक स्पष्ट म्हणजेच क्लेअर दिसते .

हल्लीच्या मॉनिटरमध्ये टीवी टूनेरकार्ड रेडी मेट बसवलेले असते या मुळे केबल डायरेक्ट आपणास मॉनिटरवर पहायला मीळते. मॉनिटर वर खालच्या बाजूला बटन असतात ह्या बटनाने मॉनिटरचा स्क्रीन वरचा आकार कमी जास्त करता येतो . कंट्रास्ट व Brightness या मुळे वाढवता आणि कमी करता येतो . शिवाय मॉनिटर बंद किवा चालू करण्याचे बटन देखिल इथेच असते .

Thursday, September 18, 2008

एस.एम.पी.एस. (SMPS)

एस.म.पी.एस. (Switch Mode Power Supply) :- संगणकाला गरज असते ती Direct Crrent (DC) विजपुरवठ्याची . संगणका चे इलेक्ट्रॉनिक घटक चालवण्यासाठी आणि डेटा सूचनांचे पालन करण्यासाठी त्याला विजेची आवशकता असते . एस.म.पी.एस. हे एसी वोल्टेज DC मध्ये कनवर्ट करतो . कैबिनेट हे विविध शेप, स्टाइल आणि साइज़ मध्ये उपलब्ध आहेत त्या कैबिनेट मध्येच एस.म.पी.एस. बसवूण मिळतात. SMPS दोन प्रकारचे आहेत . AT आणि ATX अश्या स्वरूपात आहेत .
ATX SMPS सध्या बाजारात उपलब्ध आहेत . आणि तेच जास्त वापरात आहेत . एसी व्होल्टेज कनवर्ट करून मदर बोर्ड आणि अन्य उपकरणाला सप्लाई देतो . SMPS एक बॉक्स सारखा असतो . SMPS चे वजन हलके आणि आकाराने लहान असते . त्यात एक फंखा लावलेला असतो जेन्हे करून SMPS जास्त गरम होवू नये . SMPS मधून हार्ड डिस्क , सीडी रोम , फ्लोपी ड्राइव , आणि मदर बोर्ड ला सप्लाई देतो . एस.म.पी.एस. एक fuse असतो व्होल्टेज जास्त जाले की तो डैमेज होतो . त्या मुळे System ला एफ्फेक्ट्स होत नहीं. लैपटॉप मध्ये ही एसी एडाप्टर असते जे system च्या बाहेर असते . नोट बुक ची ब्याटरी या मुळे २ ते ३ तास विज पुरवठा साठवूण ठेवतो .

सीडी रोम/ राईटर

हल्ली फ्लोपीचा जमाना निघून जाउन सीडीचा जमाना आला आहे . कारण ही त्याला तशेच आहे . सीडी ही कमी कीमती मध्ये सध्या उपलब्ध झाली आहे . शिवाय फ्लोप्लीच्या पेक्षा कित्तेक पट माहिती सीडी मध्ये साठवाली जाते . शिवाय फ्लोपी ही कधी ही डैमेज होवू शकते खराप होवू शकते या मुळे त्यातील माहिती नष्ट होते . सीडी मध्ये ह्या सर्व संभावना खुपच कमी असतात .


700 MB येवढी माहिती CD मध्ये साठवाली जाते . ह्या CD मध्ये सुद्धा चुम्बकीय पदार्थाने बनवली असते . Cd वर लिहिलेलं माहिती खोड़ता येत नाही . म्हणुन याला ROM असे ही म्हणतात . Re-Writeable CD वर फ़क्त माहिती बऱ्याच वेळा लिहिता अथवा खोडाता येते . CD मधली माहिती रीड करण्या साठी CD रोम ड्राइव ची गरज असते . हा सीडी रोम ड्राइव CPU मध्ये बसवला असतो . हा देखिल फ्लोपी ड्राइव प्रमाणे CPU च्या बाहेर असतो म्हणजेच त्याच तोंड बाहेरून दिसते आणि त्या तिथूनच CD रीड केली जाते . सीडी रोम ड्राइव ला SMPS मधून व्होल्टेज दिले जातात . CD मधला डाटा रीड होत असताना सीडी रोम ड्राइव ची लाईट ब्लिंक होते .



डीवीडी रोम ही सीडी रोम सारखा असतो त्यात डीवीडी आणि सीडी रीड होते . सीडी राईटर मधे सीडी राइट होते तर डीवीडी राईटर मधे सीडी + डीवीडी राइट होते . डीवीडी ही ४ जीबी किवा ८ जीबी एवढ्या कैपसिटी मध्ये उपलब्ध आहे . संगणकाच्या सीडी किवा डीवीडी मध्ये असणारे फाइल , फोटो , मुव्हिज आपल्या सीडी किवा डीवीडी प्ल्येअर मध्ये आपण RUN करू शकतो .

फ्लोपी डिस्क ड्राइव

फ्लोपी डिस्क ड्राइव (Floppy Drive) संगणकाच्या CPU मध्ये बसवलेला असतो ह्याचा पुढील भाग ज्या मधून फ्लोपी आत टाकली जाते तो भाग CPU च्या पुढील भागातून दिसतो . त्या फ्लोपी ड्राइव ला SMPS मधून व्होल्टेज पॉवर वोल्टेज दिले जाते . मदर बोर्ड वरून फ्लोपीडिस्क केबल फ्लोपी ड्राइव ला संपर्कासाठी जोडलेली असते . ३.५" च्या फ्लोपी सध्या मार्केट मध्ये उपलब्ध आहेत . त्यामुळे त्याच आकाराच्या फ्लोपी डिस्क मिळतात . पूर्वी ५.१/२ " च्या फ्लोपी ड्राइव असत त्यामुले ५.१/२ " च्या फ्लोपी मिळत त्यांची माहिती साठवण्याच्या क्षमते पेक्षा सध्या जास्त डाटा त्यात साठवता येतो . १.४४ एम्. बी. एवढ्या साइज़ची माहित ह्या ३.५" फ्लोपी मध्ये साठवता येते .



फ्लोपी च्या चोकोनी आवरणा खाली माहिती साठवण्यासाठी गोलाकार चुबकीय गुणधर्म असलेला पदार्थापासून माहिती साठवता येते .या डिस्कवर प्रतेक ट्रैक्स असतात . प्रतेक ट्रैक्स अनेक सेक्टर मध्ये विभागले असतात . रीड राइट स्केटर द्वारे माहिती राइट किवा रीड केले जाते . फ्लोपी मधील माहिती राइट किवा रीड करण्यासाठी फ्लोपी ड्राइव मध्ये टाकली जाते . शिवाय डाटा डिलीट होवू नये याकरीता फ्लोपी वर राइट प्रोटेक्शन नोंच असते . ह्या नोँच च्या मदतीने आपण फ्लोपी मधला डाटा बंद (लोंक) करू शकतो . परन्तु आता सध्या फ्लोपी वापरण्याचे प्रमाण कमी होत लागले आहे .

हार्ड डिस्क (Hard Disk)


हार्ड डिस्क संगणकाच्या CPU मध्ये बसवलेली असते . ती फ्लोपी प्रमाणे सहजरित्या बाहेर काढली जात नाही . हार्ड डिस्क पेटि प्रमाणे असते . याच पेटी मध्ये ३ ते ८ डिस्क एकावर एक अशा रचलेल्या असतात . या पैकी प्रतेक ट्रैक्स व सेक्टर असतात प्रतेक डिस्कला रीड राइट हेड असतात .
पूर्वीच्या हार्ड डिस्क च्या आकाराने हल्लीच्या हार्ड डिस्क अतिशय लहान आकारात उपलब्ध झाल्या आहेत . हार्ड डिस्क मध्ये माहित फ्लोपी डिस्क पेक्षा किती तरी जास्त पटीने साटवता येते .
आता बाजारात 20Mb पासून ते 80Gb पेक्षा जास्त आकारात उपलब्ध आहेत . संगणका मध्ये जी माहित साठवली जाते ती म्हणजे हार्ड डिस्क मध्ये . हार्ड डिस्क हा एलेक्ट्रोनिस्क भाग आहे या मुळे तो कधी ही ख़राब होवू शकतो बिघडू शकतो . म्हणुन हार्ड डिस्क वरील डाटा ची माहिती दुसया हार्ड डिस्क वर अथवा CD वर Backup म्हणुन घेतली जावू शकते . शिवाय डाटा लॉस झाला तरी तो रिकोवर करता येतो .
आता बाजारात साटा हार्ड डिस्क आल्या आहेत ह्या नोर्मल हार्ड डिस्क पेक्षा जास्त वेगाने डाटा ट्रान्सफर करतात आणि त्यांची डाटा साठवून ठेवण्याची क्षमता जास्त आहे 300Gb पेक्षा जास्त क्षमता असणारी हार्ड डिस्क अतिशय अल्प दरात मिळते .

मेमरी ( Memory )

CPU म्हणजे प्रोसेसर नतर मेमरी हा संगणकाचा महत्वाचा भाग आहे. मेमरी म्हणजे स्मरणशक्ति होय. ही मेमरी CPU मध्ये मदर बोर्ड वर स्लोट मध्ये लावली जाते . या कंप्यूटरच्या मेमरिचे २ भागात वर्गीकरण केले जाते . १) रीड ओनली मेमरी (Read Only Memory) २) रंण्डम एक्सेस मेमरी (Random Access Memory)

१) रंण्डम एक्सेस मेमोरी (Random Access Memory) :-
RAM साधारण डाटा स्टोर करण्यासाठी उपयोगी येते . Ram ही Volatile आहे या मुळे पीसी बंद केला की डाटा नष्ट होवून जातो . RAM चे ही २ प्रकार आहेत .१) Static Ram २) Dynamic Ram Static Ram ला एकादी माहिती भेटली की ती पीसी जोपर्यंत बंद होत नाहीं तो पर्यंत तशीच राहते . याला ३० किवा ७२ पिंस असतात . Dynamic Ram ला डाटा Maintain करण्यासाठी Constant रेफ्रेशिंग लागते आणि हे अतिशय जलदगतीने होते . याला १६८ पिन्स असतात आणि ही RAM Statics Ram पेक्षा स्वस्त मिलते .

२) रीड ओनली मेमोरी (Read Only Memory) :-
नावामध्ये सांगीतल्या प्रमाणे ही मेमरी फ़क्त वाचण्यासाठी होतो.यात माहिती पुसता किवा बदलता येत नाही. कॉम्प्युटर सुरु केला की बूट स्टार्ट अप मध्ये ही मेमरी वाचली जाते. पीसी बंद असला तरी ही माहिती डाटा पुसला किवा नष्ट होत नाही .
डीडीआर रंम (DDR RAM) :- आलिकड़च्या काळात ह्या DDR RAM खुप नावाजल्या आहेत . याच कारण अस की ह्या मेमरिचा स्पीड बाकीच्या मेमरी पेक्षा डबल असतो आणि त्या कमी ही त्याच स्पीड ने करतात . SD Ram पेक्षा ह्या प्रकारच्या RAM दुप्पट डाटा ट्रान्सफर करतात शिवाय ह्या स्वस्त ही आहेत बाकीच्या मेमरी पेक्षा ह्यांचा स्पीड DDR 266Mhz च्या पेक्षा जास्त आहे .

प्रोसेसर (Processor)

प्रोसेसर (Processor) :-
ज्या प्रमाने मानवी रीरात मेंदू माणसावर कंट्रोल ठेवते त्याच प्रमाने प्रोसेसर संगणकाच्या सर्व हालचालीवर लक्ष ठेवते 8०८८ हा PC च्या युगातील पहिला मायक्रो प्रोसेसर आहे . प्रोसेसरला मायक्रो प्रोसेसर ही म्हणतात कारण तो लहान भागानी अती सूक्ष्म अशा इलेकट्रोनिक्स भागानी बनला आहे . हा मदर बोर्ड वरच्या सोकेट वर बसवला जातो . सिलिकन लयेर्सनी बनलेला असतो ह्या मध्येच अर्थिमटिक लॉजिक यूनिट व कंट्रोल यूनिट आहे . प्रोसेसर प्रोसेसिंग करताना गरम होवू नये या करता त्याच्यावर Heat Sink व Fan लावला जातो . 8०८८ नत्तर ८०२८६, ८०३८६, ८०४८६ असे अधिक वेगवान प्रोसेसर इंटेल कंपनी ने बनावले . त्यां नंतर त्या कम्पनी ने पेंटियम नावाची सीरिज काढली त्यात प्रोसेसरला त्याच्या स्पीड ने नावे देण्यात आली पेंटियम , पेंटियम १, पेंटियम २, पेंटियम ३ आणि सध्या सर्वत्र संगणका मध्ये जास्त प्रमाणात वापरला जाणारा पेंटियम ४ त्याला P-IV देखिल म्हणतात . पेंटियम ची सुरवात झाली तेव्हा त्याचा स्पीड 60MHZ एवढा होता आता 2 Ghz पेक्षाजास्त आहे सध्या डिवो कोर , डुअल कोर प्रोसेसर उपलब्ध आहेत ह्याची विशिष्ट आशी आहेत की हे बाकीच्या प्रोसेसर पेक्षा जास्त स्पीड ने काम करतात . शिवाय दोन प्रोसेसर असल्याने एक खराप किवा निकामी झाल्या मुळे दुसर्या प्रोसेसर वर पीसी सुरु राहु शकतो . Celeron Microprocessor हा P-II सारखा आहे पण यात Cache मेमोरी कमी आहे . हा जलद आणि स्वस्त आहे आता २ GHZ ते ३.८ Ghz पर्यंत हा उपलब्ध आहे .

को -प्रोसेसर :-
गणित किवा अवघड अशी उदा. सोडवण्यास को प्रोसेसर मुळे मदत होते सध्याच्या मायक्रो प्रोसेसर मध्ये बिल्ट इन मायक्रो को प्रोसेसर आहेत .
o

मदर बोर्ड (Motherboard)

मदर बोर्ड (Motherboard) हे संगणकाचे ह्रदय आहे . याला सिस्टमचा मेनबोर्ड असे ही म्हणतात. संगणका मधले सर्व डिव्हाईस एकत्र आणण्याचे काम मदर बोर्ड करतो. मदर बोर्ड वरील कॉम्पोनेन्ट आपला संगणकाचा प्रकार त्याची कार्यक्षमता , मर्यादा ठरवतो मदरबोर्ड को - प्रोसेसर , बायोस , मेमरी तसेच अनेक स्लोट असतात. मदर बोर्डसर्व कार्ड ला सपोर्ट करतो उदा. टीवी टुनेरकार्ड , साउंडकार्ड , डिस्प्ले कार्ड .
मदर बोर्ड विकत घेताना जास्तीत जास्त प्रकारच्या इंटरफेस आणि स्टैण्डर्ड कंट्रोल्स असलेला घेण चागले असते. मदर बोर्ड मध्ये मेमरी चिप्स स्पेशल वेगळा सेट असतो जो मेमरी पेक्षा वेगळा असतो व प्रोग्राम सुरु होण्यासाठी उपयोगी पडतो या अतिरिक्त मेमरीला बोंयस् असे म्हणतात.
मदर बोर्ड हा CPU मध्ये जोडलेला असतो त्याला SMPS च्या सहाय्याने व्होल्टेज दिले जाते याच मदर बोर्डवरुन प्रोसेसर ही जोडलेला असतो . ATX आणि AT असे दोन भाग या मदर बोर्डचे आहेत ATX मदर बोर्ड सध्याच्या कॉम्प्युटर मध्ये वापरले जातात

Wednesday, September 17, 2008

माउस (Mouse)

माउस (Mouse) :-

की-बोर्ड सारखे माउस आवश्यक इतके नसले तरी विन्डोज़च्या जगात अतीशय उपयोगात पडणारे माउस हे इनपुट उपकरण आहे . माउस द्वारे अक्षरे किवा अंक टाइप करता येत नाहीत . माउस हे दर्शक उपकरण आहे . माउस जसा आपण हलवतो तसा माउसचा पाँटर हालातो . साधारण माउस ला ३ बटन असतात . आता सध्याच्या माउस मधे २ बटन असतात आणि स्क्रोल्लिंगसाठी व्हिल २ बटणाच्या मध्ये असते . माउस CPU च्या मागील भागाला जोडले असते . माउस सीरियल , युसबी तसेच वायरलेस पोअर्ट मध्ये उपलब्ध आहेत . माउसच्या मध्यमा मुळे ग्राफिक्स , डिजाईन , चित्र , आकृत्या काढने सहज शक्य होते . मिक्रोसॉफ्ट पैंट मध्ये माउस च्या सहाय्याने चित्र काढली जातात .
माउसचे ३ प्रकार आहेत.

मेंकेनिकल माउस :-
माउसचा हा सुरवातीचा प्रकार म्हणजेच ह्याच्या खालच्या भागाला एक लहानशी गोटी च्या आकाराचा बॉल असतो जो माउस सोबत फिरत असतो त्याची वायर CPU ला जोडली असत.
ओप्टिकल माउस :- ह्या माउस ला खालच्या भागाला गोटी नसते . माउस च्या बाहेर पडणारा प्रकाश माउसच्या हालचालीवर नियंत्रण ठेवतो .
कॉर्डलेस माउस :-
अशा प्रकारचा माउस हा बटरी वर चालतो . CPU सोबत वायरलेस द्वारे चालतो . आशा माउस ला वायरलेस माउस देखिल म्हणतात .
माउस साधारण खालील प्रकारच्या क्रिया करतो .
१) क्लिक :- माउस चे डावे बटन एकदा प्रेस करून लगेच सोडून देणे या क्रियेला क्लिक असे म्हणतात . एखादी गोष्ट क्लिक करून आपण निवडू शकतो .
२) डबल क्लिक :- डावे बटन लागोपाठ दोनदा प्रेस करून सोडणे म्हणजे डबल क्लिक होय . एखादा प्रोग्रम्म , फाइल ओपन उघडण्यासाठी माउस मध्ये डबल क्लिक चा उपयोग करतात .
३) राईट क्लिक :- माउस चे उजवे बटन एकदा प्रेस करून लगेच सोडून देणे या क्रियेला राईट क्लिक असे म्हणतात . एखादी गोष्ठी संदर्भातील सुचानांची यादी आपण पाहू शकतो स्क्रीन वर .