Friday, September 19, 2008

मॉनिटर (Monitor)

की -बोर्डच्या मदतीने संगणकाला दिलेली माहिती ज्या दूरदर्शन संचासारख्या दिसणारया पडद्या वर उमटते त्याला "मॉनिटर" असे म्हणतात . मॉनिटर म्हणजे व्हिजुअल डीस्प्ले यूनिट असे म्हणतात किवा व्ही .डी .यु . असे ही म्हणतात . मॉनिटर संगणकाचे आउट पुट डिव्हाईस असे म्हणतात . मॉनिटरला संगणकाचे आउट पुट डीव्हाईस असे म्हणतात .

मॉनिटरचा आकार :
मॉनिटरचा आकाराचे मोजमाप त्याच्या पडद्याच्या म्हणजेच स्क्रीनच्या कर्नाच्या लांबी मध्ये केले जाते . सामान्यत बाजारात १५" , १७" , १९", २१" अश्या स्वरुपाचे मॉनिटर उपलब्ध आहेत . फ्लाट्स स्क्रीन चे मॉनिटर हल्ली जास्त प्रमाणात विकले जातात . जेवढा आकार मोठा तेवढी त्याची किंमत जास्त असते .

मॉनिटरचे प्रकार :-


इलेक्ट्रानिक्स क्षेत्रातील प्रगती मुळे विविध प्रकारचे मॉनिटर उपलब्ध झाले आहेत . मॉनिटर आकाराच्या आणि तंत्राच्या बाबती मध्ये टेलीविजन सारखेच असतात . मॉनिटर हे कैथोड रे ट्यूब पासून बनले आहेत म्हणुन त्याना CRT ( कैथोड रे ट्यूब ) असे म्हणतात .

CRT चा आकार मोठा असल्याने छोट्या आणि सूट सुटीत आकाराच्या मॉनिटर ची निर्मिती सुरु झाली . या मॉनिटरला फ्लैट स्क्रीन मॉनिटर असे म्हणतात किवा LCD म्हणजे लिक्विड क्रिस्टल डीस्प्ले असे म्हणतात . असे मॉनिटर आकाराने लहान व कमी जागा व्यापणारे असतात . परन्तु हे नोर्मल मॉनिटर पेक्षा जास्त कीमती मध्ये मिळतात . लैपटॉप ,पाम टॉप, नोट बुक मध्ये अशा स्वरुपाचे फ्लैट स्क्रीनचा वापर करतात .


पाहिले मॉनिटर हे एक रंगी असायचे त्याला मोनोक्रोम म्हणजे ब्लैक एंड व्हाइट मॉनिटर असे म्हणतात . सध्या रंगीत म्हणजेच कलर मॉनिटर वापरले जातात . ब्लैक एंड व्हाइट मॉनिटर मध्ये ब्लैक,व्हाइट, केशरी, हिरवा किवा करडा रंग वापरला जातो . तर रंगीत मॉनिटर मध्ये लाल , हिरवा , निळ्या रंगाचा वापर केला जातो .


मॉनिटर रेझोलुशन:- मोनिटर वर दिसणार्या चित्रांचा दर्जा मॉनिटरच्या रेझोलुशन वर अवलंबून असतो . मॉनिटर वर आपण जी अक्षरे , अंक , चित्र पाहतो ते लहान ठिपक्यानी बनाले असते. या ठिपक्याना पिक्सॅल असे म्हणतात . मॉनिटर वर उभ्या आणि आडव्या ओळित मांडलेले असतात . दर एकक क्षेत्र फळात जेवढे जास्त पिक्सॅल तेवढे चित्र अधिक क्लेअर मॉनिटर वर दिसते .
मॉनिटर वर दिसणारे रंग हे मदर बोर्ड वर लावलेल्या कलर ग्राफिक्स कार्ड वर अवलंबून असते . सध्या VGA आणि SVGA कार्ड उपलब्ध आहेत . सुपर व्हीडीओ ग्राफिक्स अडाप्टर आणि विडियो ग्राफिक्स अडाप्टर . सुपर सुपर विडियो ग्राफिक्स अडाप्टर मध्ये ४० लाख रंग छठा पडद्यावर दिसतात . या मध्ये पिक्सॅल जवळ असल्याने १०२४ ओळि आणि प्रतेक लाइन मध्ये १२८० पिक्सॅल असतात . पिक्सॅलची सख्या वाढली का आकारमान कमी होते . आणि चित्र अधिक स्पष्ट म्हणजेच क्लेअर दिसते .

हल्लीच्या मॉनिटरमध्ये टीवी टूनेरकार्ड रेडी मेट बसवलेले असते या मुळे केबल डायरेक्ट आपणास मॉनिटरवर पहायला मीळते. मॉनिटर वर खालच्या बाजूला बटन असतात ह्या बटनाने मॉनिटरचा स्क्रीन वरचा आकार कमी जास्त करता येतो . कंट्रास्ट व Brightness या मुळे वाढवता आणि कमी करता येतो . शिवाय मॉनिटर बंद किवा चालू करण्याचे बटन देखिल इथेच असते .

No comments: