फ्लोपी डिस्क ड्राइव

फ्लोपी डिस्क ड्राइव (Floppy Drive) संगणकाच्या CPU मध्ये बसवलेला असतो ह्याचा पुढील भाग ज्या मधून फ्लोपी आत टाकली जाते तो भाग CPU च्या पुढील भागातून दिसतो . त्या फ्लोपी ड्राइव ला SMPS मधून व्होल्टेज पॉवर वोल्टेज दिले जाते . मदर बोर्ड वरून फ्लोपीडिस्क केबल फ्लोपी ड्राइव ला संपर्कासाठी जोडलेली असते . ३.५" च्या फ्लोपी सध्या मार्केट मध्ये उपलब्ध आहेत . त्यामुळे त्याच आकाराच्या फ्लोपी डिस्क मिळतात . पूर्वी ५.१/२ " च्या फ्लोपी ड्राइव असत त्यामुले ५.१/२ " च्या फ्लोपी मिळत त्यांची माहिती साठवण्याच्या क्षमते पेक्षा सध्या जास्त डाटा त्यात साठवता येतो . १.४४ एम्. बी. एवढ्या साइज़ची माहित ह्या ३.५" फ्लोपी मध्ये साठवता येते .फ्लोपी च्या चोकोनी आवरणा खाली माहिती साठवण्यासाठी गोलाकार चुबकीय गुणधर्म असलेला पदार्थापासून माहिती साठवता येते .या डिस्कवर प्रतेक ट्रैक्स असतात . प्रतेक ट्रैक्स अनेक सेक्टर मध्ये विभागले असतात . रीड राइट स्केटर द्वारे माहिती राइट किवा रीड केले जाते . फ्लोपी मधील माहिती राइट किवा रीड करण्यासाठी फ्लोपी ड्राइव मध्ये टाकली जाते . शिवाय डाटा डिलीट होवू नये याकरीता फ्लोपी वर राइट प्रोटेक्शन नोंच असते . ह्या नोँच च्या मदतीने आपण फ्लोपी मधला डाटा बंद (लोंक) करू शकतो . परन्तु आता सध्या फ्लोपी वापरण्याचे प्रमाण कमी होत लागले आहे .