Saturday, September 20, 2008

इंटरनेट (Internet)

१९६९ मध्ये अमेरिकेने अनुदान दिलेल्या एका प्रोजेक्टरने इंटरनेशनल संगणक नेटवर्क विकसित केले . जगातील छोट्या नेटवर्क ला जोडणारे नेटवर्क म्हणजे इंटरनेट होय . १९९२ मध्ये स्वित्झलंड येथे सेंटर फॉर उरोपिन न्यूक्लिअर रिसर्च मधून (CERN) वेब अर्थात वर्ल्ड वाइड वेब (www) आपल्या पर्यंत पोहचले . ह्याच्या पूर्वी इंटरनेट म्हणजे ग्राफिक्स , एनीमेशन , ध्वनी व्हिडिओ इंटरफेस नसलेल माध्यम होते . वेब मुळे ह्या सर्व गोष्टी नेट वर पहाणे शक्य झाले . आणि इंटरनेट २१ व्या शतकातील एक मेकांच्या सपर्काचे प्रभावी साधन बनले. इंटरनेट वायर, केबल, सॅटॅलाइट यांच्याशी जोडून बनले आहे . तर वेब इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या डाटा सही जोडून देतो ते वेब .इंटरनेट चा वापर खलील गोष्टी साठी सामान्यत केला जातो.

सपर्क :- इंटरनेट द्वारे केलि जाणारी ही एक लोकप्रिय बाब आहे . तुम्ही ईमेल च्या द्वारे तुम्ही कुठल्या ही जगातील व्यक्तिशी संपर्क साधू शकता . आवडीच्या विषयावर चर्चा करण्यासाठी भाग घेवू शकता इतकेच नाही तर तुम्ही स्वतच वेब पेज म्हणजेच वेब साईट ही बनवू शकता .

शोपिंग :- इंटरनेट च्या माध्यमातून तुम्ही शोपिंग करू शकता किवा एखादी वस्तु विकू ही शकता . बाजारात आलेल्या नविन वस्तुंची माहिती नेट मुळे आपणास बघायला मीळते. एलेक्ट्रोनिस्क कार्ड किवा डेबिट कार्ड वापरून तुम्ही ही खरेदी करू शकता .



सर्चिंग :- एखाद्या विषयावर माहिती शोधणे इंटरनेट मुळे सोपे झाले आहे . जगातील कुठल्या ही वस्तूची अथवा गोष्टीची माहिती हवी असल्यास ती आपणास इंटरनेट मुळे मीळु शकते . शिवाय इ-बुक मुळे कुठल्या ही ग्रंथालायाची बुक्स, पुस्तके आपणास नेट वर फ्री मध्ये वाचायला भेटतात . शिवाय ऑनलाइन न्यूज़ ही वाचायला किवा व्हीडीओ द्वारे बघायला मीळते. उदा . http://www.starmajha.com/ मग लगेच स्टार माझा न्यूज़ चेनल वेब पेज तुमच्या स्क्रीन वर ओपन होइल . त्यात न्यूज़ बातम्या संदर्भामधील माहिती आपण पाहू शकतो .

मनोरंजन :- या विषयावर सांगाव तेवढ कमी आहे कारण या विषयावर इंटरनेट वर भरपूर माहितींचा खजाना आहे . संगीत , चित्रपट , मासिक तसेच आता ऑनलाइन चित्रपट ही आपण नेटवर पाहू शकतो . सध्या ऑनलाइन गेम्स ही नेट वर उपलब्ध आहेत .

इंटरनेट आणि दूरध्वनी या दोन्ही यंत्रणा सारख्याच आहेत जश्या प्रकारे टेलेफोन ला टेलेफोन ची केबल जोडली जाते तशाच प्रकारे संगणकालाही इंटरनेट जोडले जाते . इंटरनेट ज्या वेळेस तुमच्या संगणका सोबत जोडले जाते तेव्हा तुमचा संगणक हा जगातील भल्या मोठ्या संगणकाचा भाग बनतो कारण त्या वेळेस आपण जगातील कुठल्याही ठिकाणी नेट माध्यमातून जावू शकतो .गूगल अर्थ एक अस इंटरनेट वरील साईट आहे की कुठल्या ही देशा मधून फोटो आपण पाहू शकतो . इंटरनेट बरोबर जोड़नी करण्यासाठी इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर्स (ISP) हे आपल्याला इंटरनेट जोड़नी साठी एक्सेस देते . हा एक्सेस लोकल नेटवर्क माध्यमातून किवा टेलेफोन माध्यमातुन असतो . बिनतारी म्हणजेच वायरलेस कनेक्शन इंटरनेट चे मोडेम मुळे मीळते.


इंटरनेट कनेक्ट होण्यासाठी संगणक ब्राउजर्स असणे गरजेच असत . यात माइक्रोसॉफ्ट इंटरनेट हे खुप लोकप्रिय ब्राउजर्स आहेत . संगणकाच्या डेस्कटॉप आणि प्रोग्राम्स मध्ये हे ब्राउजर्स आहेत . वेबसाइट चे नाव किवा URL ( यूनीफोर्म रिसोर्स लोकेटर्स ) माहिती असणे गरजेच आहे . सगणका मधील डाटा ची देवाण घेवाण करण्यासाठी वापरत येणार्या नियमाना प्रोटोकॉल असे म्हणतात. http:// हा सर्वसाधारण वापरात येणारा प्रोटोकॉल आहे . तर .com (.कॉम) म्हणजे कोमुनिकेशन होय.

1 comment:

Anonymous said...

Top 10 Beginners for Baccarat - Wilbur Young
A beginner's guide to Baccarat at WYNN BACCARAT in the United States. febcasino We cover the basics 바카라 사이트 of Baccarat, where to play and where to play for fun! choegocasino